Lonavala : अवकाश संशोधन परिषदेकरिता प्रज्ञेश म्हात्रेची निवड

एमपीसी न्यूज : नासा व इस्त्रोशी संलग्न असलेल्या आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन (आयएसी) परिषदेकरिता लोणावळा येथील सिंहगड महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रज्ञेश लक्ष्मण म्हात्रे याची निवड झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात होणार्‍या या अवकाश संशोधन परिषदेमध्ये 86 देशातीलच 4320 शोध निबंध सादर केले जाणार आहे. यामध्ये प्रज्ञेशच्या शोध निबंधाचा समावेश आहे. प्रज्ञेश हा सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी लोणावळा येथिल मॅकेनिकल अभियांत्रिकीचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. 

पृथ्वी बाहेर मानवी वसाहत राहू शकेल अशा ग्रहांच्या शोध मोहिमेतील टायटन या शनिच्या 52 व्या चंद्राच्या पृष्ठभागावरील बदलाचा अभ्यास व पृथ्वी व मंगळासहित इतर ग्रहांच्या प्रदुषणाचे पृथक्करण करुन त्यामध्ये मानवी शरिर कसे टिकवावे या विषयांवर शोधनिबंधांचे प्रज्ञेश अमेरिकेतील वाॅशिंग्टन येथिल परिषदेत सादरीकरण करणार आहे. प्रज्ञेशच्या या यशाचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कौतुक केले असून सिंहगडचे प्राचार्य व संचालक डाॅ. एम.एस.गायकवाड यांनी संस्थेच्या वतीने प्रज्ञेशचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.