Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 12 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौरा

एमपीसी न्यूज – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर ( Prime Minister Narendra Modi) येणार आहेत. ते नाशिक येथे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करतील आणि देशातील तरुणांशी संवाद साधतील. तसेच नवी मुंबई येथील कार्यक्रमात विविध विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली जाणार आहे.

यावर्षी, राष्ट्रीय युवा दिन विविध शासकीय विभागांच्या सहकार्याने देशातील जिल्ह्यांमध्ये युवा व्यवहार विभागाच्या सर्व क्षेत्रीय संघटनांद्वारे साजरा केला जाईल. या मोहिमेत 88 हजार पेक्षा अधिक स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.

राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) युनिट्स, नेहरू युवा केंद्र संघटन (एनवायकेएस) आणि विविध शैक्षणिक संस्थांच्या पाठिंब्याने देशभरातील ‘माय भारत’ स्वयंसेवक, भारतासाठी स्वयंसेवक म्हणून उपक्रम राबविण्यासाठी त्यांची ऊर्जा एकवटतील.

Pune : आजपासून पावसाचा जोर ओसरणार, तर थंडी पुन्हा वाढणार

12 जानेवारी रोजी देशातील प्रमुख शहरे आणि 750 जिल्हा मुख्यालयांमध्ये रस्ते सुरक्षा जनजागृती ( Prime Minister Narendra Modi) कार्यक्रम आयोजित केले जातील. प्रशिक्षित रस्ता सुरक्षा स्वयंसेवकांना केंद्र/राज्य मंत्री, स्थानिक खासदार किंवा आमदार यांच्याकडून हिरवा झेंडा दाखवून, व्यापक मोहिमेद्वारे उद्याची सुरक्षितता निर्माण करण्याची वचनबद्धता दर्शविली जाईल. हे स्वयंसेवक वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी वाहतूक हाताळण्यात मदत करण्यासाठी आणि रस्ता सुरक्षा जागरूकता उपक्रम राबवण्यासाठी तैनात केले जातील.

कार्यक्रमात सहभागी मंत्रालये आणि त्यांची जिल्हास्तरीय कार्यालये 12 जानेवारी 2024 रोजी विविध प्रदर्शने/उपक्रम/नोंदणी/जागरुकता मोहिमेसाठी स्टॉल उभारतील. तसेच वाहतूक जागरूकता, पोषण आणि आहार, केव्हीआयसी स्टार्टअप्सची उत्पादने, पीएमईजीपी  लाभार्थी इ. मुद्द्यांवर यावेळी भर दिला जाईल. या सर्व कार्यक्रमांचे आयोजन डिजिटल माय भारत व्यासपीठावर जिल्हास्तरावर तयार केले जात आहेत, जेणेकरुन जास्तीतजास्त युवकांपर्यंत पोहोचता येईल. प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य आणि युवा आकांक्षा व्यापकस्तरावरील उपक्रमांमधून प्रतिबिंबित व्हावेत, या उद्देशाने या कार्यक्रमांचे आयोजन केले जाण्याबाबतची माहिती केंद्र शासनाच्या युवा कल्याण व क्रीडा मंत्रालयाने दिली आहे. या उपक्रमात नोंदणीसाठी माय भारत डिजिटल प्लॅटफॉर्म (https://mybharat.gov.in) द्वारे स्वयंसेवकांची नोंदणी केली जाईल.

मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या दिघी रेल्वे स्थानकाचे उद्घाटन, उरण रेल्वे मार्गीकेचे उद्घाटन, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (शिवडी – न्हावा शेवा) या सेतूचे उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ( Prime Minister Narendra Modi) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.