Main Atal Hoon Movie : ‘मैं अटल हूं’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज

पंकज त्रिपाठी म्हणतात - मी टीकेला तयार

एमपीसी न्यूज – अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘मैं अटल हूं’ हा ( Main Atal Hoon Movie) चित्रपट येत आहे. चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला असून पुढील काही दिवसात तो प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणारे अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी या चित्रपटावर टीका होईल, असा अंदाज वर्तवला आहे.

Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 12 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौरा

पंकज त्रिपाठी म्हणाले, “अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल. त्यांच्या कविता ऐकल्या असतील. पण त्यांची गोष्ट मात्र तुम्हाला माहिती नसेल. हीच गोष्ट आता आम्ही तुमच्या भेटीला घेऊन येत आहोत. मी माझ्या पद्धतीने अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. या भूमिकेनंतर मी आधीपेक्षा शांत झालो आहे.

‘मैं अटल हूं’ हा चित्रपट राजकारणावर आधारित नसून तो राजकीय व्यक्तिमत्वावर आधारित आहे. त्यांचे पूर्ण आयुष्य दोन तासात उलगडणे शक्य नाही. तरीही अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. 19 जानेवारी 2024 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

राम मंदिर प्राण प्रतिष्ठा आणि ‘मैं अटल हूं’ चित्रपट प्रदर्शित होण्याचा काहीही संबंध नसल्याचे त्रिपाठी यांनी स्पष्ट केले. हा चित्रपट अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशी 25 जानेवारी रोजी प्रदर्शित करण्याचे ठरले होते. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे तो 19 जानेवारी रोजी प्रदर्शित करावा लागत आहे. या चित्रपटावर आरोप होतील, टीका होईल, पण आम्ही त्यासाठी तयार आहोत, असेही पंकज त्रिपाठी यांनी स्पष्ट ( Main Atal Hoon Movie)  केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.