Pune: गवत बाहेर काढतो, तसे हे मोदी सरकार बाहेर काढायचे – शरद पवार

एमपीसी न्यूज – गवत जसे बाहेर काढतो, तशा प्रकारे(Pune) हे मोदी सरकार बाहेर काढायचे आहे. नेहरू, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी यांनी देशासाठी काम केले. आज मोदीच्या काळात राज्याची भूमिका असहकार्याची आहे, अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. 
महाविकास आघाडी इंडिया फ्रंटचा पुणे शहर कार्यकर्ता मेळावा(Pune) आज काँग्रेस भवनमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना नेते सचिन अहीर, खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, चंद्रकांत हंडोरे, आमदार रवींद्र धंगेकर, विश्वजित कदम, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे (ठाकरे गट),  काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, शरद पवार गटाचे अध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, संजोग वाघिरे उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, आजचा हा कार्यकर्त्यांचा ऐतिहासिक मेळावा आहे. मागील 10 वर्षांत एक कलमी कार्यक्रम होत आहेत. केवळ नेहरूंच्या सारख्या नेत्यांवर हल्ला करण्याचे काम मोदी करतायेत. जवाहरलाल नेहरू यांनी देशासाठी काम केले. देश योग्य दिशेने नेण्याचे काम केले. सर्व जग हे मान्य करीत आहे. पण, मोदी हे मान्य करायला तयार नाही. हा देश शेतीप्रधान आहे.

मी शेती विषयात काम केले. शेतकरी आत्महत्याची काळजी घेण्याचे आवाहन डॉ. मनमोहन सिंग यांनी केले. यवतमाळमध्ये शेतकऱ्यानी आत्महत्या केल्यावर त्याची चौकशी केली. 70 हजार कोटींची शेतकरी कर्जमाफी केली. आता शेतकरी आत्महत्याकडे मोदी सरकार दुर्लक्ष करीत आहे. शेतकरी आज संकटात आहे. 1 वर्षे झाले दिल्ली दरबारी शेतकरी आंदोलन करतायेत. त्यांच्याकडे हे सरकार बघायलाही तायर नाही. राष्ट्रवादी भ्रष्टाचार केल्याचे सांगत आहेत. त्याची चौकशी करावी.
जे काही कडक धोरण अवलंबाल त्याला आमचे सहकार्य असेल. दिल्लीत केजरीवाल यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रात अनिल देशमुख यांना वर्षेभर त्रास दिला. त्यांची आज सुटका झाली. सामनाचे संपादक संजय राऊत यांना जेलमध्ये टाकले. ईडी, सीबीआयचा वापर करून सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. इंडिया आघाडीने मोदी सरकारला खाली खेचण्यासाठी प्रयत्न करावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.