Pune: जेव्हा जेव्हा पुण्यातील खासदार आमचा निवडून येतो, तेव्हा तेव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार येते – नाना पटोले

एमपीसी न्यूज – जेव्हा जेव्हा पुण्यातील खासदार काँग्रेसचा निवडून (Pune)येतो, तेव्हा तेव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार येत असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. 
महाविकास आघाडी इंडिया फ्रंटचा पुणे शहर कार्यकर्ता मेळावा आज (Pune)काँग्रेस भवनमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पटोले बोलत होते.
नाना पटोले म्हणाले, 2024 वर्षे हे अत्याचारी सत्तेला खाली खेचणारे आहे. देवेंद्र फडणवीस हे भविष्यवाणी करतात, ती खोटी करतात. मी भविष्यवाणी करीत नाही. बिहार, युपीमध्ये इंडिया आघाडीला फायदाच होत आहे.
आपले प्रधानमंत्री हे जगाचेच प्रधानमंत्री झाल्यासारखे वागत आहे. आता सध्या 400 पार असल्याचे संगतायेत. नशीब ते 500 पार करायलाही मागे पुढे पाहणार नाहीत. शेतकरी कर्जमाफी, 2 कोटी रोजगार, काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यावर 15  लाख रुपये टाकणार असल्याचे मोदी यांनी म्हटले होते. प्रत्यक्षात काहीच झाले नाही.

आंदोलन करायला पोलीस परवानगी देत नाहीत. पुण्याची संस्कृती बिघडविण्याचे पाप पोलीस करीत आहेत. त्याची आम्ही नोंद घेत आहोत. माझ्या पुण्याला, राज्याला ड्रग्जने बरबाद होऊ देऊ नका, त्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत. समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक करणार असल्याचे सांगितले होते. केवळ महाराजांच्या नावावर मते घेऊन सत्तेत आले.
हे राज्यातील खोक्यांचे सरकार आहे. संविधानाला वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊयात. मत विभागणीच्या आधारावर ही व्यवस्था सत्तेवर आली. त्यांना खेचण्यासाठी सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र आणण्याचे काम केले आहे. 2024 ला याच तुतारिणी सरकारला जाब विचारायचं आहे. धनगर समाजाला लॉलीपॉप देण्याचं काम फडणवीस आणि सरकारने केले. आज मराठा आणि ओबीसीमध्ये भांडणे लावायचे काम या सरकारने केली.
आमचे केंद्रात सरकार आल्यावर राष्ट्रीय जनगणना करू. आणि मराठा समाजाला आरक्षण देऊ पण, हे राज्य सरकार जरांगे पाटील यांच्याशी काय बोलणे झाले, ते सांगायला तयार नाही. त्यामुळे जरांगे यांच्या विरोधात बोलले जात आहे.
10 वर्षांत सर्व व्यवस्था संपविण्याचे काम मोदी सरकारने केले. आमचे इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर मीडियाला स्वायत्तता आणुन देऊ. आता मोदी सरकार येणार नाही, तर इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.