Rahatani Crime News : स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय, स्पा सेंटर चालकाला अटक

एमपीसी न्यूज – स्पा सेंटर मध्ये वेश्याव्यवसाय चालविणा-या स्पा सेंटर चालकाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. अजिंक्य तारा स्पा सेंटर, रहाटणी येथे गुरूवारी (दि.24) ही कारवाई करण्यात आली.

तानाजी मारूती जाधव (वय 26, रा. रहाटणी, मुळगाव – म्हाडा, सोलापूर) असे अटक स्पा सेंटर चालकाचे नाव आहे. एका महिलेने याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी स्पा सेंटर चालक तानाजी आर्थिक फायद्यासाठी स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय चालवत असल्याचे पोलिसांनी निष्पन्न झाले. वाकड पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले आहे. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.