Talegaon Dabhade : अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ धरणे आंदोलन

एमपीसी न्यूज : रिपब्लिक चॅनलचे ज्येष्ठ संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्ष तळेगाव दाभाडे शहराच्या वतीने मारुती मंदिर चौक येथे “एक तासाचे धरणे आंदोलन”  करण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी ठाकरे सरकारचा खरपूस समाचार घेतला. शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने, सरचिटणीस प्रमोद देशक,प्रदिप गटे, प्रसिद्धीप्रमुख महेश सोनपावले,भाजयुमो त.दा.स्टेशन अध्यक्ष शिवांकुर खेर, भाजयुमो सरचिटणीस पद्मभूषण डंबे, यांनी यावेळी सरकारच्या दंडेलशाही व हुकुशाही विरोधात सरकारचा धिक्कार आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केला.

या निषेध आंदोलनास प्रमुख उपस्थिती मावळ तालुकाध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे, गटनेते अमोल शेटे,नगरसेवक अरूण भेगडे,प्रभारी वैभव कोतुळकर,तालुका भाजप महिला उपाध्यक्षा नगरसेविका शोभा भेगडे,माजी शिक्षण मंडळ सभापती निलेश मेहता,माजी नगरसेवक ॲड.श्रीराम कुबेर, महिला मोर्चा अध्यक्षा मोहिनी भेगडे,भाजयुमो गाव विभाग अध्यक्ष-अक्षय भेगडे, कार्याध्यक्ष प्रशांत दाभाडे,युवती आघाडी अध्यक्षा कु.अपुर्वा मांडे, युवती सरचिटणीस साक्षी ठाकूर, विद्यार्थी आघाडी कार्याध्यक्ष मयुर भोकरे, ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी कार्याध्यक्ष अनिल वेदपाठक, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष सुनिल कांबळे, सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष दिनेश कुलकर्णी, आघाडी कार्याध्यक्ष पद्मनाभ पुराणिक,किसान मोर्चा अध्यक्ष अजय भेगडे, पदवीधर आघाडी अध्यक्ष अलंकार भोसले,उपाध्यक्ष संजय जाधव,हिम्मतभाई पुरोहित,सचिन आरते,सुधीर खांबेटे, संजय दाभाडे, गणेश आप्पा भेगडे, आशुतोष हेंद्रे,दिपक नि.भेगडे,चिटणीस हेमंत वाणी,महावीर कणमुसे,ललीत गोरे, महिला मोर्चा सरचिटणीस मीना अजय भेगडे,उपाध्यक्षा ज्योती वैद्य,ज्योती दिपक भेगडे,संज्योक्ता आगळे,भाजयुमो सरचिटणीस निखिल म्हाळसकर,उपाध्यक्ष सागर भेगडे,मंगेश जाधव,योगेश जांभूळकर,अवधूत टोंगळे,संदिप जवळेकर,राहुल पाठारे,हर्ष माळी,जयेश भेगडे,मयुर पाठारे,सौरभ यादव,सौरभ लोणकर,विनय माने,अविष्कार भेगडे,नीरज भेगडे,सौरभ भेगडे,समीर भेगडे,संदेश जाधव,मिथिलेश जाधव,ओम माने,आकाश कदम,साहिल जाधव, ओंकार माने हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाजयुमो संघटनमंत्री केदार भेगडे यांनी केले.या वेळी सरकारच्या दडपशाही विरोधात घोषणा देण्यात आल्या.

आभार कार्याध्यक्षा कु.धनश्री बागले यांनी मानले.कार्यक्रमाचे संयोजन सरचिटणीस विनायक भेगडे, प्रदीप गटे,प्रमोद देशक, श्रीमती रजनी ठाकूर,शोभा परदेशी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.