Talegaon Dabhade News: शहरात प्रभागनिहाय लसीकरण अभियान राबविण्याची मागणी

एमपीसी न्यूज : संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे शहरामध्ये प्रभागनिहाय लसीकरण अभियान सक्षमपणे राबवावे, अशी मागणी तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने मावळचे तहसीलदार मधुसुदन बर्गे  यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारी विरुद्धच्या या लढाईमध्ये लसीकरण अभियान हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. या महामारीमधून सहीसलामत बाहेर पडण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे लसीकरण होणे अत्यावश्यक आहे.

सध्या चालू असलेल्या लसीकरण केंद्रावर अतिशय गर्दी होत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते आहे. अनेकजण पहाटेपासून रांगा लावून लसीकरण करण्यासाठी धावपळ करताना दिसून येतात.

या अभियानाची गती वाढवून एक प्रकारे Combing Oparation होणे गरजेचे बनलेले आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे शहरामध्ये प्रभागशः लसीकरण अभियान सक्षमपणे राबवले तर नागरीकांची अडचण दूर होईल व वेळही वाचून भल्या पहाटे धावपळही करावी लागणार नाही असे स्पष्ट करून प्रभागाप्रमाणे लसीकरण करावे अशी विनंती निवेदनात केली आहे.

यावेळी शहराध्यक्ष रवींद्र बाळासाहेब माने, नगरसेवक संतोष शिंदे, भाजयुमो तळेगाव अध्यक्ष अक्षय भेगडे, स्टेशन भाजयुमो अध्यक्ष शिवांकुर खेर, तळेगाव शहर उपाध्यक्ष संजय जाधव, हिम्मतभाई पुरोहित, आशुतोष हेंद्रे, ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप सुतार, ओबीसी मोर्चा कार्याध्यक्ष सचिन जाधव, भाजयुमो सरचिटणीस निखिल म्हाळसकर, उपाध्यक्ष सागर भेगडे आदी उपस्थित होते

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.