Pimpri : नागरी सुविधा केंद्र चालकांना आर्थिक सहाय्य द्या – श्रीरंग बारणे

Provide financial assistance to citizen facilitation centre operators demands MP Shrirang Barne.

एमपीसी न्यूज – नागरी सुविधा केंद्र चालकांना लाॅकडाऊनमुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. सरकारच्या प्रत्येक योजनेची यशस्वीरित्या अंमलबजावणी करणाऱ्या केंद्रांना महापालिकेने आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी  महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात ते म्हणतात, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 50 हून अधिक नागरी – सुविधा केंद्रांना रोजगार दिला. या केंद्रचालकांनी 50,000 डिपॉझीट पालिकेकडे जमा करून केंद्र चालु केली आहेत.

केंद्रामार्फत येणाऱ्या शैक्षणिक आणि महसुली योजना ऑनलाईन करणे सुरू झाल्यामुळे महानगरपालिकेचा ताण कमी झाल्याचे बारणे सांगतात.

सरकारच्या प्रत्येक योजनेची यशस्वीरित्या अंमलबजावणी करणाऱ्या केंद्रांना लॉकडाऊन झाल्यापासुन ताबडतोब बंद करण्याचे आदेश देण्यात आले.

केंद्र चालकांची उपजिविका सुविधा केंद्रावर अवलंबून असल्यामुळे केंद्र चालकांना दुकान भाडे, वीज बिल, इंटरनेट बिल, कर्जाचे हप्ते व स्वतःच्या कुटुंबाचे पालनपोषण करणे अवघड झाले आहे.

नागरीसुविधा केंद्रांना आर्थिक चणचण निर्माण झाल्यामुळे त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे, म्हणून पालिकेने याबाबत विचार करून केंद्र चालकांना योग्य आर्थिक मदत करावी अशी मागणी बारणे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like