Pune : नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील तिघांचा जामीन मंजूर

एमपीसी न्यूज – नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील तीन आरोपींना पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. सीबीआयने मुदतीत आरोपींविरोधात आरोपपत्र सादर न केल्याने जामीन मंजूर करण्यात आला आहे.

अमोल काळे, राजेश बंगेरा आणि अमित देगवेकर अशी जामीन मिळालेल्या आरोपींची नावे आहेत.

नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींचा पुणे सत्र न्यायालायने जामीन मंजूर केला. सीबीआय ने आरोपींविरोधात 90 दिवसात आरोपपत्र सादर न केल्याने हा जामीन मजूर करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना जामीन मंजूर झाला असला तरी राजेश बंगेरा आणि अमित देगवेकर हे दोघे सध्या गौरी लंकेश हत्या प्रकरणात कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) न्यायालयीन कोठडीत आहेत. तर अमोल काळे हा गोविंद पानसरे हत्या प्रकरणात विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) कोठडीत आहे.

अमोल काळे चिंचवड येथील रहिवासी आहे. कर्नाटक, बंगळूरु येथील लंकेश पत्रिका या साप्ताहिकाच्या संपादिका गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी चिंचवडमधून त्याला 31 मे रोजी विशेष तपास पथकाने ताब्यात घेण्यात आले. अमोल काळे मागील दहा ते बारा वर्षांपासून चिंचवड येथील माणिक कॉलनीमध्ये अक्षय प्लाझा येथे वास्तव्यास आहे. त्याचे कुटुंब एका हिंदुत्वादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती आहे. कर्नाटक पोलिसांनी केलेल्या चौकशीत काळे याच्याकडे 74 सिमकार्ड आणि 22 मोबाइल फोन आढळून आलेले आहेत. या सिमकार्डपैकी बरीचशी सिमकार्ड त्याने पुण्यातून खरेदी केलेली असून अन्य महाराष्ट्राच्या इतर शहरामधून आणि बेळगावी मधून घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे त्याच्याकडे मिळालेल्या डायरीमध्ये एक चिट्ठी आढळून आली असून त्यामध्ये 12 वेगवेगळ्या व्यक्तीची नावे लिहिलेली आहेत. त्यामध्ये गौरी लंकेश यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे निदर्शनास आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.