Pune : धरणांत 97 टक्के पाणीसाठा; तरीही पुणेकरांना मिळेना पुरेसे पाणी

एमपीसी न्यूज – पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत सध्या 97 टक्के पाणीसाठा आहे. मात्र, पुणेकरांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याचा तक्रारी आहेत.

पानशेत धरणात 10.65 टीएमसी, टेमघर 2.85, वरसगाव 12.82, तर खकडवासला धरणांत 1.97 असा एकूण 28.29 टीएमसी म्हणजेच 97.05 टक्के पाणीसाठा आहे. पण, पुणेकरांना 2 वेळ चांगल्या दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी पुणे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या आहेत.

मागील वर्षी याच कालावधीत या धरणांत 24.27 टीएमसी म्हणजेच 97.05 टक्के पाणीसाठा होता. काल धारण क्षेत्रात चांगला पाऊस झाला. रोज रात्री पाऊस होत आहे. ऑक्टोबर महिना संपला आहे, तरीही पुणे महापालिका आणि पदाधिकाऱ्यांना पुणेकरांच्या पाण्याचे नियोजन काही जमले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.