Pune : कंटेनरला धडकून 62 वर्षीय नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – कंटेनरने अचानक ब्रेक दाबल्याने मागची (Pune) दुचाकी कंटेनरला धडकली. यात 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि.11) माळवडी येथे चाकण तळेगाव रोडवर घडला.

याप्रकऱणी कौस्तुभ सुनिल चव्हाण (वय 25 रा.लोणावळा) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात सुनिल शिवराम चव्हाण (वय 62) यांचा मृत्यू झाला आहे.

Hinjawadi : पिस्टल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील हे दुचाकीवरून जात होते . यावेळी त्यांच्या समोर जाणाऱ्या कंटेनरने अचानक ब्रेक दाबला. याची कोणतीही कल्पना नसल्य़ाने फिर्यादी (Pune) यांचे वडील कंटेनरला मागून धडकले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला व यातच त्यांचा मृत्यू झाला. यावरून कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.