Pune : विमानाने येऊन ब्रँडेड कपडे आणि बूट चोरणाऱी राजस्थानमधील टोळी गजाआड

एमपीसी न्यूज – विमानाने येऊन शहरातील मोठ्या मॉलमधून ( Pune ) महागडे ब्रॅंडेड कपडे आणि बूट चोरणाऱ्या आरोपींना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून ब्रँडेड कंपनीच्या पॅंट, टी-शर्ट असा सुमारे सव्वाचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौरव कुमार रामकेश मीना (वय 19), बलराम हरभजन मीना (वय 29, दोघे रा. गणीपूर, जिल्हा दौसा, राजस्थान), टोळी प्रमुख योगेश कुमार लक्ष्मी मीना (वय 25 रा. सूरोड, जिल्हा करौली, राजस्थान) आणि सोनू कुमार बिहारीलाल मीना (वय 25) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

Pune : पुण्याचा पारा 39 अंशावर, येत्या रविवारी तुरळक पावसाची शक्यता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी संगमवाडी येथील आरटीओ कार्यालयासमोरील एका मॉलमधून आरोपींनी कपडे घेतले. त्यानंतर ते दुकानातून पळून जात होते. परंतु सुरक्षा रक्षकांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. मॉलनजीक असलेल्या पेट्रोलपंपाजवळ असलेल्या त्यांच्या मोटारीची झडती घेतली. त्यावेळी मोटारीत ब्रॅन्डेड कंपनीचे कपडे, बूट आणि बेल्ट आढळून आले. याबाबत त्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी आरोपीकडे चौकशी करून टोळी प्रमुख योगेश मीनाला खडकी बाजार येथील हॉटेलमधून ताब्यात घेतले. तर सोनू मीनाला पुणे रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले. तपासादरम्यान बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

हि कारवाई  वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान पवार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) श्रीकांत निंबाळकर यांच्या सूचनेनुनसार सहायक निरीक्षक अभिजित जाधव, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर बडे, शिवाजी सरक, मनोज भोकरे ( Pune ) यांच्या पथकाने  केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.