Pune : पुण्याचा पारा 39 अंशावर, येत्या रविवारी तुरळक पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज : –  सध्या पुण्याचा पारा ही 39 अंशाच्या घरात असून (Pune) कमाल तापमान 39.2 अंश तर किमान तापमान हे 18.9 अंश सेल्सिअस नोंदवला गेले आहे. राज्यात ही विदर्भ , मराठवाडा परिसरात तापमान चाळीशी पार गेले आहे. याचाच परिणाम म्हणून दक्षिण तमिळनाडू ते पूर्व विदर्भापर्यंत हवेच्या खालच्या स्तरात एक द्रोणिका रेषा तयार झाली आहे.

ही रेषा कर्नाटक आणि मराठवाड्यावरून जाते. त्यामुळे शुक्रवारपासून हवेत आद्रता वाढून पाच ते आठ एप्रिल दरम्यान मध्य महाराष्ट्रात. सहा ते आठ एप्रिल या काळात कोकण, मराठवाड्यात आणि सात ते आठ एप्रिल दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

 Chhatrapati Sambhajinagar : कपड्याच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत 7 जणांचा मृत्यू

पुण्यात दोन दिवसांपासून कमाल तापमान 39 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदले जात आहे. मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर येथील वेधशाळेत कमाल तापमान 39.2 अंश सेल्सिअस नोंदल्याची माहिती हवामान खात्याने दिली.शिवाजीनगर येथे अवघ्या 48 तासांमध्ये किमान तापमानाचा पारा 3.7अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाला.

मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमानाचा पारा 22.4 वरून 18.9 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला.शहर आणि परिसरात पुढील चार दिवस म्हणजे शनिवारी (दि.6) दुपारपर्यंत आकाश निरभ्र राहून दुपारनंतर आकाश ढगाळ होईल. त्यानंतर रविवार आणि सोमवारी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून, हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला (Pune) आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी येथे मंगळवारी 42.3  अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. जळगाव, मालेगाव, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, नांदेड, बीडसह संपूर्ण विदर्भात पारा 40 अंशांवर होता.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share