Chhatrapati Sambhajinagar : कपड्याच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत 7 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) छावणी परिसरात कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. यामध्ये दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या 7 जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन मुलांचाही समावेश आहे. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. हे कपड्याचे दुकान छावणी दाना बाजार  गल्लीतील महावीर जैन मंदिरच्या बाजूला होते.

वसीम शेख ( वय- 30 वर्षे),  तन्वीर वसीम  ( वय – 23 वर्षे) , हमीदा बेगम  ( वय  50 वर्षे) , शेख सोहेल ( वय- 35 वर्षे) , रेश्मा शेख -( वय  22 वर्षे) , आसिम वसीम शेख ( वय – 3 वर्षे  ) , परी वसीम शेख (  वय 2 वर्षे  )  अशी मृतांची नावे आहेत.

Wakad : अपना वतन संघटनेच्या विरोधात जोडे मारो आंदोलन

अधिक माहिती अशी की, – छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरातील जैन मंदिराजवळ असलेल्या एका तीन मजली इमारतीमधील किंग स्टाईल टेलर्स या कापड दुकानाला मध्यरात्री अचानक आग लागली.  दरम्यान,    तातडीने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं  . मात्र, तोपर्यंत सर्व दुकान जळून खाक झालं होतं.   यामध्ये दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या 7 जणांचा गुदमरून मृत्यू झाला होता. या घटनेत अग्निशमाक दलाचा एक जवानही जखमी (Chhatrapati Sambhajinagar)झाला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.