Wakad : अपना वतन संघटनेच्या विरोधात जोडे मारो आंदोलन

काळा खडक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पास विरोध करत असल्याचा आरोप

एमपीसी न्यूज – काळाखडक झोपडपट्टीचे शासनामार्फेत पुनर्वसन केले जात ( Wakad) आहे. मात्र या परिसरात वास्तव्यास नसतानाही अपना वतन या संघटनेकडून प्रकल्पाला विरोध होत असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी मंगळवारी (दि. 2) जोडे मारो आंदोलन केले.
काळाखडक झोपडपट्टीचे शासनामार्फत पुनर्वसन होत आहे. मात्र पुनर्वसनाला विरोध करणारे अपना वतन संघटनेचे पदाधिकारी सिद्दीकी शेख, जितेंद्र जुनेजा व संघटनेतील इतर पदाधीकारी हे काळाखडक येथील रहिवासी नाहीत. मात्र संघटनेकडून सामान्य जनतेच्या मनात शासनाबद्दल गैरसमज निर्माण करून दिशाभूल करण्यात येत आहे.
दरम्यान, संघटनेतर्फे प्राधिकरण कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला होता. यामुळे मिळकतीवर राहणाऱ्या नागरिकांची दिशाभूल होत आहे. याचा निषेध करत स्थानिक नागरिकांकडून मंगळवारी संघटनेच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. याबाबत याबाबत वाकड पोलीस ठाण्यात स्थानिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असणारे निवेदन देण्यात आले आहे.

या प्रकरणी नागरिकांमध्ये वादविवाद तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ( Wakad) याची जबाबदारी संघटनेची असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच याबाबत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
स्थानिक रहिवासी अमोल देवकर म्हणाले, “या प्रकल्पास काळा खडक येथील स्थानिकांनी विरोध केल्यास त्याबाबत आमचे काही मत नाही. मात्र इथले रहिवासी नसतानाही इथल्या लोकांना भडकावून या प्रकल्पास खोडा घालणाऱ्यांबाबत आमचा विरोध आहे. शासनाकडून इथल्या प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळणार आहे. इतरांनी स्थानिक नागरिकांना भडकावून खोडा घालू नये.”
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे म्हणाले, “मे. जय एंटरप्राईजेस हे जमीन मालक असून काळा खडकचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांचा एकमेव प्रस्ताव आमच्याकडे दाखल झाला आहे. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य एक दोन विकसक प्रयत्न करत असल्याचे आमच्या कानावर आहे. मात्र नियमानुसार जागा मालकाला प्रथम प्राधान्य दिले जाते. त्यामुळे मे. जय एंटरप्राईजेस यांचा प्रथम संधीने प्रस्ताव मान्य केलेला आहे.”
सिद्दीक शेख म्हणाले, “स्थानिकांनी तक्रार केल्याने मी पूर्वी आंदोलन केले होते. आता बिल्डरच्या सांगण्यावरून काही लोकांनी माझ्या व संघटनेच्या विरोधात आंदोलन केले आहे. लवकरच मी त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार ( Wakad) आहे.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.