Pune : येरवडा येथे नवजात अर्भक प्लास्टीकच्या पिशवीत गुंडाळून फेकून दिले

एमपीसी न्यूज – गर्भपात करून चार महिन्यांचे अर्भक प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून ( Pune ) फेकून दिल्याची घटना येरवडा येथील पांडू लमाण वस्तीत घडली. अनैतिक संबंधातून किंवा मुलगी असल्याचे निदान झाल्याने अर्भक फेकून दिल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलीस कर्मचारी आनंद मन्हाळकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञाताविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Pune : कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात येणार झेब्रा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडू लमाण वस्तीतील शंकर मंदिराच्या कट्ट्या समोर बुधवारी सकाळी चार महिन्यांचे अर्भक मृत अवस्थेत प्लॅस्टिकच्या पिशवीत फेकलेले आढळून आले. सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अर्भकाची पाहणी करून ससून रुग्णालयात पाठवले.

चार महिन्यांचे अर्भक जन्माला येण्यापूर्वी गर्भपात करून फेकून देण्यात आले. अनैतिक संबंधातून किंवा अर्भक मुलगी असल्याचे निदान झाल्याने फेकून देण्यात आले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने तपास सुरू करण्यात ( Pune ) आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.