Mumbai : जैन समाजातील ज्ञानगच्छी सुश्राविका उगमदेवी मेहता यांचे निधन

एमपीसी न्यूज – जैन समाजातील ज्ञानगच्छी सुश्राविका उगमदेवी संपतराजजी मेहता (वय 78) यांचे काल (गुरुवारी) सकाळी (Mumbai) मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. एमपीसी न्यूजचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक लखपतराज मेहता यांच्या त्या मातोश्री होत.

Pune : येरवडा येथे नवजात अर्भक प्लास्टीकच्या पिशवीत गुंडाळून फेकून दिले

उगमदेवी मेहता या धार्मिक प्रवृत्तीच्या ज्ञानगच्छी सुश्राविका होत्या. त्यांचे संपूर्ण आयुष्य धर्मकार्याला समर्पित केले होते. आयुष्यभर त्यांनी ज्ञानदानाचे काम केले. अनेक श्राविकांना धार्मिक कार्याशी जोडले होते. मा सतीजींवर त्यांची नीतांत श्रद्धा होती. राजस्थानमध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.

त्यांच्या मागे तीन मुलगे, एक मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. उगमदेवी मेहता यांच्या पार्थिवावर मुंबईतील चंदनवाडी मरीन लाईन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात (Mumbai) आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.