Pune : चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्वामीनारायण मंदिरात घुसला ट्रक

एमपीसी न्यूज – चालकाने ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट स्वामीनारायण मंदिरात ( Pune) घुसला. ही घटना रविवारी (दि. 14) रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास पुणे-बंगळूरू महामार्गावर घडली.

Pune Metro : जिल्हा न्यायालयाच्या आवारात मेट्रो स्टेशन उभारण्यासाठी प्राधिकरणाला जागा मिळाली

रविवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास मुंबई-बंगळूरू महामार्गावरून जाणारा एक ट्रक नऱ्हे येथील स्वामीनारायण मंदिराच्या प्रवेशद्वारात घुसला. ट्रकने दुचाकीला धडक दिली असून यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.

नागरिकांनी जखमी दुचाकीस्वाराला नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातात ट्रक आणि दुचाकीचे नुकसान झाले आहे. ट्रकने आणखी दोन कारला देखील धडक दिली असून त्या दोन कारचे देखील नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले ( Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.