Pune Accident News : डंपरखाली सापडून दुचाकीस्वार महिला ठार

एमपीसीन्यूज : भरधाव ट्रॅव्हल बसच्या धडकेत दुचाकीस्वार दाम्पत्य रस्त्यावर पडले. त्यावेळी समोरून आलेल्या डंपरखाली सापडून महिला ठार झाली.

हा अपघात दोन दिवसांपूर्वी रात्री नउच्या सुमारास हडपसर- स्वारगेट रस्त्यावरील एका गॅरेजसमोर घडला.

उजमा मोहसिन पठाण (वय ३४, रा. कोंढवा) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मोहसिन पठाण यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मोहसिन आणि त्यांची पत्नी दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी एका खासगी बस चालकाने त्यांना पाठीमागून धडक दिली. त्यात दोघेही दुचाकीवरून खाली पडले. त्याचवेळी समोरून आलेल्या डंपरखाली सापडून उजमा जागीच ठार झाल्या तर मोहसिन जखमी झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.