Pune : भरधाव कंटेनरची 11 वर्षीय मुलाला धडक; मुलाचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज :  पुण्यातील (Pune) कोलवडी ते थेऊर फाटा दरम्यान भरधाव कंटेनरने सायकलवरून जाणार्‍या 11 वर्षीय मुलाला दिलेल्या धडकेत मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

रामा पिंटू पवार (वय 11, रा.थेऊर) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर आरोपी सुनीलकुमार तेजबहादूर यादव (मूळचा रा. उत्तरप्रदेश) या कंटेनर चालकास अटक करण्यात आली आहे.

Pimpri : शहरात 390 अनधिकृत मोबाईल टॉवर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (Pune) रामा पिंटू पवार हा मंगळवारी दुपारच्या सुमारास कोलवडी ते थेऊर फाटा रोडवर सायकलवरून जात होता. त्यावेळी mh12 nx 3625 या क्रमांकाच्या कंटेनरने रामा पवारच्या सायकलला धडक दिली. या घटनेत रामाच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

तर या प्रकरणी कंटेनर चालक सुनीलकुमार तेजबहादूर यादव यास अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरु असल्याचे लोणी काळभोर पोलिसांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.