Pimpri : शहरात 390 अनधिकृत मोबाईल टॉवर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सध्या 390 अनधिकृत तर 533 असे 923 मोबाईल टॉवर (Pimpri) आहेत. मोबाईल टॉवर न पाडण्याबाबत न्यायालयाच्या निर्देशामुळे पालिकेला कोणतीही कारवाई करता येत नाही. मात्र, हेच अनधिकृत टॉवरला निश्‍चित दंड करून अधिकृत करण्यात येणार आहे. दंडाची रक्कम ठरविण्याचा अधिकार आयुक्तांना देण्यात आला आहे.

शहरात 390 अनधिकृत मोबाईल टॉवर आहे. अनधिकृत टॉवरमुळे महापालिकेचे दरवर्षी कोट्यवधींचे परवानगी शुल्क व मिळकतकर बुडत आहे. हे रोखण्यासाठी अनधिकृत मोबाईल टॉवरला निश्‍चित दंड करून अधिकृत करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

अनधिकृत टॉवरला महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 तसेच, विकास नियंत्रण नियमावलीनुसार नियमांचे
उल्लंघन केल्याप्रकरणी तडजोड शुल्क आकारून अशा बाबी नियमित करण्यास मान्यता देण्यात येते. तसा ठराव महापालिका सर्वसाधारण सभेने 19 मे 1997 ला मंजुर केला आहे. या बाबीसाठी, शुल्कासाठी दर निश्‍चित केले आहेत. या दरामध्ये वेळोवेळी बदल केले.

Kondhwa : दारू पिण्यावरून भांडण; भाच्याने मामाला पाठवले यमसदनी

अनधिकृत मोबाईल टॉवर नियमित करण्यासाठी आयुक्तांच्या मान्यतेने तडजोड शुल्काचे दर निश्‍चित (Pimpri) केले आहेत. दरात केलेल्या बदलास सर्वसाधारण सभेची मान्यता नाही. त्यामुळे हे दर निश्‍चित करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्याचा प्रस्ताव बांधकाम परवानगी विभागाने पालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवला होता.

त्या प्रस्तावाला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे अनधिकृत मोबाईल टॉवरला दंड करून अधिकृत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.