Pune :जनजागृती व चर्चेनंतर पुण्यात हेल्मेट सक्ती – अमितेश कुमार

एमपीसी न्यूज – प्रथम हेल्मेटबाबत जनजागृती मोहीम(Pune) राबविण्यात येईल. त्यामध्ये नागरिकांचा प्रतिसाद पाहून आणि संबंधित घटकांशी चर्चा केल्यानंतरच हेल्मेट सक्तीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

पोलिस आयुक्त कार्यालयात बुधवारी (दि.7) सायंकाळी(Pune) ते पत्रकारांशी बोलत होते. अमितेश कुमार म्हणाले, पुणे शहरात वाहतूक कोंडी ही मोठी समस्या आहे. नागरिकांना वाहतूक कोंडीत बराच वेळ अडकून पडावे लागते.

त्यामुळे ही समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी पहिल्या टप्प्यात शहरातील प्रमुख दहा ते बारा चौक आणि रस्ते (हॉटस्पॉट) निश्चित करण्यात आले आहेत. महापालिका आणि संबंधित एजन्सींसमवेत चर्चा करून तेक्षील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्याचे लगेचच परिणाम दिसून येतील असे नाही. परंतु त्यासाठी संबंधित एजन्सीबाबत चर्चा सुरू केली आहे.

Pune : थंडी होणार गायब, शहराचा पारा 35 अंशावर, राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज

याबरोबरच बेकायदेशीर दारू विक्री, मटका, जुगार क्लब असे अवैध धंदे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत. पब्ज वेळेवर बंद करण्यात येतील. कोयता गॅंग रेकॉर्डवरील गुन्हेगार सर्वांच्या विरोधात मोहीम सुरू कली आहे. शरद मोहोळ यांच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी पोलिस आयुक्तांना भेटून अर्ज दिला आहे. त्याबाबत चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येईल.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.