Pune : थंडी होणार गायब, शहराचा पारा 35 अंशावर, राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज

एमपीसी न्यूज – फेब्रुवारी सुरु झाल्यापासून थंडी (Pune)हळूहळू गायब होत असून उन्हाचा चटका जाणवत आहे. पुण्याचे कालचे (बुधवारी) कमाल तापमान हे 35.5 अंश सेल्सिअस पर्यंत होते.

 

सरासरीपेक्षा 4.1 अंश सेल्सिअसने हा पारा वाढला होता. पुणे हे बुधवारी राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.

राज्यात सोलापूर येथे सर्वाधिक तर, त्या खालोखाल (Pune)सांगलीत 35.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. त्यानंतर पुण्यातील शिवाजीनगर आणि लोहगाव येथे कमाल तापमान नोंदले गेले. शिवाजीनगर येथील किमान तापमान 16.1 अंश सेल्सिअस नोंदले गेले. तर लोहगाव येथे 17.9 किमान तापमान नोंदले गेले.

Pune : रोहित पवारांच्या माजी सुरक्षा रक्षकाने नागरिकावर रोखले पिस्तूल, सुरक्षारक्षक ताब्यात

येत्या शनिवारपासून (दि.. 10) आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाचा चटका अंशतः कमी होईल. कमाल तापमानाचा पारा 33 ते 32 अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरेल, अशी शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आली.

पूर्व विदर्भापासून तेलंगणा, कर्नाटक पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान होत आहे.तापमानातील वाढ कायम राहण्याबरोबरच, विदर्भ, मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. येत्या शुक्रवारपासून (दि.9) ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.