Pune : रोहित पवारांच्या माजी सुरक्षा रक्षकाने नागरिकावर रोखले पिस्तूल, सुरक्षारक्षक ताब्यात

एमपीसी न्यूज – गाडीला कट मारला या किरकोळ (Pune )कारणावरून दोन मुलांवर एकाने पिस्तूल ताणत जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी (दि.7) सायंकाळी हडपसर जवळील माळवाडी परिसरात घडली.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून तो आमदार रोहित पवार यांचा माजी सुरक्षारक्षक असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

प्रताप धर्म टक्के (वय 39 धंदा – सुरक्षा रक्षक, राहणार – के डी हिल्स, शेलार मळा, कात्रज पुणे )असे अटक व्यक्तीचे नाव आहे.

Ravet : क्रिएटीव्ह मिडीयम स्कूलची मान्यता रद्द करण्याची शिफारस

पोलिसांनी.दिलेल्या माहितीनुसार, टक्के हा गाडीतून जात (Pune )असताना त्याच्या गाडीला कट लागला या किरकोळ कारणावरून त्याने त्याच्याकडे असलेली परवाना धारक बंदूक त्या मुलांवर रोखली. दहशत निर्माण करत त्याने मुलांना जिवे मारण्याची धमकी दिली.

 

याप्रकणी हडपसर पोलीस ठाण्यात मुलांच्या तक्रारीवरून 352,506(2),504 भादविस 30 आर्म्स ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडील शस्त्र जप्त करण्यात आली आहे. अधिक तपास चालू आहे.

प्रताप टक्के हा जून 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये माननीय आमदार रोहित पवार यांच्याकडे खाजगी सुरक्षा रक्षक म्हणून कामावर होता. सध्या तो त्यांच्याकडे सुरक्षारक्षक म्हणून काम करीत नाही.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.