Ravet : क्रिएटीव्ह मिडीयम स्कूलची मान्यता रद्द करण्याची शिफारस

एमपीसी न्यूज – क्रिएटीव्ह अॅकॅडमी एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या (Ravet)संस्था चालकाने शाळा सुरू ठेवण्याच्या अटी-शर्ती, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क भंग करत घृणास्पद कृत्य केले असून शिक्षण क्षेत्राची मानहाणी झाली आहे.

त्यामुळे या शाळेची मान्यता व ना हरकत पत्र रद्द करावे, अशी स्पष्ट (Ravet)शिफारस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी पुण्याच्या शिक्षण उपसंचालकाकडे केली आहे.

क्रिएटीव्ह पब्लिक इंग्लिश मिडीयम स्कूलचा संचालक नाैशाद शेख याने वसतीगृहातील दहावीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार केला . तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पाेलिसांनी शेखला अटक केली. या प्रकरणानंतर महापालिकेच्या शिक्षण विभागाने शाळेत जावून पंचनामा केला. शाळेमध्ये स्वमान्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण नाही, अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला नसल्याचे समाेर आले.

Pune : ग्रँडमास्टर अभिमन्यू पुराणिक याला पुणे विद्यापीठाचा युवा पुरस्कार जाहीर

यानंतर चाैकशी समिती नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले हाेते. त्यानुसार समितीने सादर केलेल्या अहवालात गंभीर बाबी समाेर आल्या आहेत.

शाळा तपासणीत बालकांचा माेफत व सक्तीचे शिक्षणाचा हक्क अधिनियमानुसार आवश्यक असलेली मानके, प्रमाणके उपलब्ध नसल्याचे दिसून आले. तसेच शाळा मान्यते संदर्भातील कागदपत्रे आणि शाळेत घडलेल्या प्रकरणाबाबत नाेटीस बजावूनही खुलासा केला नाही. शाळेत विद्यार्थीनीवर घडलेली लैगिंक अत्याचाराची गंभीर बाब आहे. त्यामुळे क्रिएटीव्ह अॅकॅडमी एज्युकेशन सोसायटी चिंचवड संचलित क्रिएटीव्ह पब्लिक स्कुल, रेल्वे स्टेशन आकुर्डी शाळेची मान्यता व ना हरकत पत्र रद्द करावे, अशी शिफारस अतिरिक्त आयुक्त जांभळे-पाटील यांनी शिक्षण उपसंचालकांकडे केली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.