Pune : पुण्यात लवकरच स्थापन होणार क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट

एमपीसी न्यूज – पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर (Pune) धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे.

पुण्यातील गुन्हेगारांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी गुन्हे शाखेत क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट स्थापन करण्यात येणार आहे.

Pune : वाहतूक कोंडीला त्रस्त होऊन ,पुण्यात थेट सिग्नल यंत्रणेची पूजा करत आम आदमी पार्टीचे अनोखे आंदोलन

कुख्यात गुंड, रेकॉर्डवरील आणि झोपडपट्टी(Pune) परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस ठाणे आणि पोलिस चौक्यांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

सलग 2 दिवस सुरू असलेल्या गुन्हेगारांच्या परेडमुळे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काम करण्यास बळ मिळत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.