Pune : पुणे महानगर परिवहन महामंडळातील हजेरीपटावरील सर्व सेवकांची सरसकट कायम पदावर नियुक्ती करावी – मंदार जोशी

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळातील (Pune) हजेरीपटावरील सर्व बदली, हंगामी, रोजंदारी सेवकांची विनाअट, कोणतेही जाचक निकष न लावता, सरसकट कायम पदावर नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी कायदेशीर सल्लागार तथा सचिव महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशनचे ॲड. मंदार जोशी, पुणे शहर पीएमपीएमएल युनिटचे अध्यक्ष नागेश गायकवाड, कार्याध्यक्ष गणेश कदम यांनी केली आहे. त्यासंदर्भातील निवेदन पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय कोलते यांना देण्यात आले आहे.

महामंडळामध्ये मागील 10 ते 15 वर्षापासुनचे काही सेवक ब.हं.रो. या पदावर काम करीत आहेत. वास्तविक त्यांची त्याच वेळेस कायम पदावर नियुक्ती करणे बंधनकारक होते. परंतु, महामंडळाने असे न केल्याने, सदर ब.हं.रो. सेवकांचे कधीही भरून न येणारे आर्थिक, मानसिक व कौटुंबिक नुकसान झालेले आहे. महामंडळातील हजेरीपटावरील सर्व ब.हं.रो. सेवकांची विना अट, कोणतेही निकष न लावता, सरसकट कायम पदावर नियुक्ती करण्यात यावी.

Pune : एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनचे पुष्प प्रदर्शन आजपासून नागरिकांसाठी खुले

जेणेकरून संबंधित सर्व ब.हं.रो. सेवकाना न्याय मिळेल. तरी याबाबत (Pune) आपण निर्णय न घेतल्यास, अत्यंत नाईलाजास्तव दिनांक 05 फेब्रुवारी 2024 पासून आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल व त्याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील याची नोंद घेण्यात यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.