Chinchwad : प्रतिभा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सत्यशोधक सिनेमातून अनुभवले महात्मा फुले यांचे कार्य

एमपीसी न्यूज – स्वयंसिध्दा प्रतिष्ठान यांच्या वतीने चिंचवड  येथील प्रतिभा महाविद्यालयाच्या ( Chinchwad ) विद्यार्थ्यांनी सत्यशोधक हा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा बुधवारी (दि.24) पहिला. 
महात्म्यांचं कार्य आणि आपला इतिहास आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचायला पाहिजे, यातून ही तरुण पिढी प्रेरणा घेऊन देश आणि समाजाच्या जडणघडणीत योगदान देईल, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.
‘महात्मा ज्योतिबा फुले’ यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘सत्यशोधक’ हा सिनेमा विशाल ई-स्क्वेअर पिंपरी या सिनेमागृहात दाखवण्यात आला. महाविद्यालयीन शिक्षणा व्यतिरिक्त, विद्यार्थ्यांमध्ये जीवन जगण्याचे मूल्य आणि  समाजाप्रती कर्तव्याची जाणीव असणं आवश्यक आहे.

Pune : विभागीय ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकी ज्ञान आत्मसात करू नये तर, ज्यांनी आपल्या देशाच्या विकासात अनमोल असे योगदान दिले, असा महात्म्यांना जाणून घेणं त्यांचं कार्य समजून घेणे ही काळाची गरज आहे. असे संस्थेचे अध्यक्ष सविता इंगळे यांनी सांगितले. सत्यशोधक सिनेमा बोध घेण्यासारखा आहे, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
या अभिनव उपक्रमामध्ये प्रतिभा महाविद्यालयाचे सीईओ डॉ. राजेंद्र कांकरिया, प्राध्यापिका आश्लेषा देवोळे, तसेच संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार मुरडे, कार्याध्यक्ष दिनेश भोसले, सचिव ज्ञानेश्वर भंडारे, कोषाध्यक्ष वर्षा बालगोपाल यांचे सहकार्य ( Chinchwad ) लाभले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.