Pune : ‘अ‍ॅमनोरा पार्कची थकबाकी 74 कोटी, भरले फक्त सव्वा कोटी तरीही महापालिकेने सुरू केला पाणीपुरवठा’

काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचा आरोप

एमपीसी न्यूज – अ‍ॅमनोरा पार्क टाऊनशिपला मालमत्ता कर सवलत देऊन दररोजचा 10 एमएलडी पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. ही सवलत तब्बल 74 कोटी 5 लाख 83 हजार 643 इतकी आहे. त्यापैकी केवळ सव्वा कोटी रुपये या अर्जकर्त्यांने भरले. या दीड एक टक्का भरण्यावर प्रशासनानेही कुठली हरकत न घेता लागलीच मान्यता दिली असल्याचा आरोप काँगेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.

याबाबत बोलताना गटनेते अरविंद शिंदे म्हणाले की, दि. 20 नोव्हेंबरला अ‍ॅमनोरा पार्कचा करसवलतीच्या प्रस्तावावर तात्काळ कार्यवाही करीत, दि. 21 नोव्हेबर रोजी लगेच मान्य केला़. त्यांनतर पाणीपुरवठा विभागाने या टाऊनशिपला, एम्प्रेस गार्डन येथील बंद पाईप लाईनमधून दररोजचा 10 एमएलडी पाणीपुरवठाही सुरू करण्यात तत्परता दाखविली़.

_MPC_DIR_MPU_II

शासन निर्णयानुसार, 2017 मध्ये साडेसतरानळी ग्रामपंचायत ही पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाली़. या ग्रामपंचायतीमधील अ‍ॅमनोरा पार्क टाऊन या गृहप्रकल्पाची ग्रामपंचायत काळातील सन 2017-18 अखेरची कराची थकबाकी ही 41 कोटी 73 लाख 21 हजार 893 रूपये एवढी होती़. तर, या मिळकतीवर महापालिकेकडून एप्रिल २०१८ पासून 30 मार्च 2020 अखेर 32 कोटी 32 लाख 61 हजार 750 रूपये अशी थकबाकी आहे़. ही सर्व कर थकबाकी तब्बल 74 कोटी 5 लाख 83 हजार 643 इतकी आहे़.

मात्र ग्रामपंचायतीच्या थकबाकीत जिल्हा परिषद प्रशासनेही विविध सवलती व सुट देत 41 कोटी 76 लाखापैकी केवळ 28 लाख रूपये अंतिम थकबाकी दाखविली़. यामध्ये पुणे महापालिकेच्याही काही अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप शिंदे यांनी यावेळी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.