Pune : शिरुरमधून अमोल कोल्हे यांनाच पुन्हा संधी – माजी आमदार विलास लांडे

एमपीसी न्यूज-   शिरुर, भिवंडी आणि जालना या तीन लोकसभा मतदार (Pune ) संघाची आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय येथे सुरु आहे.

मागील काही दिवसांपासून अमोल कोल्हे हे भाजपात जाणार अशी चर्चा सुरू होती.त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार विलास लांडे यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघात भावी खासदार आशयाचे फ्लेक्स लावले होते.त्यावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.

Pune : आमच्या दृष्टीने ‘ती’ वारी महत्वाची  : अजित पवार 

या आढावा बैठकीला विद्यमान खासदार अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे,आमदार चेतन तुपे,आमदार सुनील टिंगरे यांच्या सह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते.याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

     या बैठकीनंतर शिरुर लोकसभा मतदार संघातून इच्छुक उमेदवार असलेले माजी आमदार विलास लांडे म्हणाले की,शिरुर लोकसभा मतदार संघातील आढावा शरद पवार यांनी जाणून घेतला.त्यावेळी अमोल कोल्हे यांना पुन्हा शिरुरमधून निवडणूक लढवावी लागेल असे आदेश दिले असल्याचे त्यांनी(Pune ) सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.