Pune : गुरु पौर्णिमेनिमित्त ‘अनुग्रह’ नृत्य कार्यक्रम

एमपीसी न्यूज – गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कलावर्धिनी ( Pune) संस्थेतर्फे ‘अनुग्रह ‘या भरतनाट्यम नृत्य सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी(मयूर कॉलनी, कोथरूड )सभागृहात 3 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

‘वारसा ‘आणि ‘परंपरा’ अशा दोन सत्रात हा कार्यक्रम होणार असून ‘वारसा’ मध्ये स्मिता महाजन,रमा कुकनूर,वृषाली चितळे-लेले ,शिल्पा देशमुख, केतकी नेवपूरकर यांचे नृत्य सादरीकरण होणार आहे.

Gold Rate : जाणून घ्या आजचे सोने व चांदीचे भाव

‘ परंपरा’ या सत्रामध्ये ज्येष्ठ नृत्य गुरु डॉ.सुचिता भिडे-चापेकर,अरुंधती पटवर्धन, सागरीका पटवर्धन यांचे नृत्य सादरीकरण होणार आहे.डॉ.सुचिता भिडे-चापेकर,त्यांची कन्या-शिष्या अरुंधती पटवर्धन आणि नात सागरीका पटवर्धन या 3पिढ्यांतील कलाकारांचे  नृत्य सादरीकरण होणार आहे,हे या कार्यक्रमाचे वैशिष्टय ( Pune) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.