Pune: संतांच्या पादुका पंढरपूरला नेण्यासाठी  इन्सिडेंट कमांडरच्या नेमणुका -जिल्हाधिकारी

Appointment of Incident Commander to take the shoes of saints to Pandharpur - Collector

एमपीसी न्यूज –  आषाढी वारीची परंपरा चालू ठेवण्यासाठी प्रतिकात्मकरित्या व  प्रातिनिधीक स्वरुपात काही महत्वाच्या संतांच्या पादुका ज्या परंपरेने विठ्ठल – रुख्मिणीच्या भेटीस जातात. त्यांना मर्यादित स्वरुपात व केवळ संतांच्या पादुका एसटी्द्वारे अथवा वाहनाद्वारे आषाढी एकादशीच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच  30 जून रोजी दशमीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे नेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. याबाबत योग्य ते नियोजन करण्याकरीता  इन्सिडेंट  कमांडर म्हणून नेमणुका करण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

त्यामध्ये पुणे जिल्हयातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज,  श्री संत तुकाराम महाराज, श्री संत सोपानदेव महाराज आणि श्री संत चांगवटेश्वर देवस्थान या चार  संतांच्या पादुका घेवून परत प्रस्थानाच्या ठिकाणी सुरक्षित येतील याबाबत योग्य ते नियोजन करण्याकरीता  इन्सिडेंट  कमांडर म्हणून नेमणूका करण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

दरवर्षी आषाढी वारीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येने भाविक संतांच्या पालखी सोबत पंढरपूर येथे जात असतात. सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात  कोरोना संसर्गाच्या वाढीस आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.

त्यानुसार कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सर्वसामान्य नागरीकांना व जनतेला होऊ नये, यासाठी पायी-पालखी वारी करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी देवाची करीता खेडचे उपविभागीय अधिकारी संजय तेली (मो.नं. 9405583799), श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहूकरीता हवेलीचे  नायब तहसिलदार संजय भोसले (मो.नं. 9960171046), श्री संत सोपानदेव महाराज संस्थान, श्रीक्षेत्र सासवडकरीता निवासी दौंडचे नायब तहसिलदार सचिन आखाडे (मो.नं. 7875078107), श्री संत चांगवटेश्वर देवस्थान, श्रीक्षेत्र सासवडकरीता  पुरंदरचे  नायब तहसिलदार उत्तम बढे ( मो.नं. 9402226218)  यांची इन्सिडेंट कमांडर म्हणून नेमणूक करण्यात  आली आहे.

नेमणुका करण्यात आलेल्या इन्सिडेंट कमांडर यांनी पादुका प्रस्थान केल्यापासून ते परत प्रस्थानाचे ठिकाणी येईपर्यंत नेमून दिलेल्या पालखी संस्थांच्या सोबत राहणे आवश्यक आहे. संबंधित उपविभागीय अधिकारी व संस्थानच्या प्रमुखांशी विचार विनिमय करुन पादुकांचा मार्ग निश्चित करावा.

सदर पादुका घेऊन जाणा-या बसेस पंढरपूर येथे रात्री 11.00 वाजेपर्यंत पोहचतील याबाबत योग्य ते नियोजन करण्यात यावे. प्रवासा दरम्यान दर्शनाला कोणत्याही ठिकाणी बस थांबविण्यात येऊ नये. तसेच संतांच्या पादुकांसोबत जाणा-या सर्व व्यक्तींनी मास्क वापरणे, दोन व्यक्तींमध्ये अंतर राखणे, वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे.

तसेच या पादुकांचे प्रस्थान झाल्यापासून पंढरपूर येथे पोहचेपर्यंत व परत पंढरपूरहून प्रस्थानाचे ठिकाणी येईपर्यंत सुरक्षित पोहचतील याबाबत जिल्हा पोलीस प्रशासन व जिल्हाधिकारी सोलापूर यांनी नियुक्त केलेल्या विनोद पाटील, श्री रुक्मणीच्या मंदिर समिती, पंढरपूर ( संपर्क क्र. 8408026069) यांच्याशी समन्वय करुन योग्य ते नियोजन करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.