Weather Report : पुण्यात हलका, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता

Chance of light rain in Pune, sparse rain in Central Maharashtra and sparse places in Marathwada

एमपीसी न्यूज – राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर बरेच दिवस पावसाने दडी मारली होती. मात्र, मागील 24 तासांत राज्यात मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर कोंकण गोवा व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला. तर येत्या 24 तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार आणि संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनजा व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता, पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

 

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) (1 सेंमी पेक्षा जास्त) 

कोकण आणि गोवा : तलासरी, वैभववाडी 3 प्रत्येकी, खेड 2, भिरा, महाड, मडगाव, मार्मगोवा 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : नंदुरबार, शहादा 10 प्रत्येकी, हर्सूल 6, दहीगाव, धुळे, जळगाव 5 प्रत्येकी, चोपडा, दिंडोरी, गडहिंग्लज, गगनबावडा, सटाना बागलाण, तळोदा 3 प्रत्येकी, बोदवड, कोपरगाव, माळशीरस, पंढरपूर, साक्री, शिराळा, श्रीरामपूर, सिन्नर, सुरगणा 2 प्रत्येकी, आटपाडी, देवळा, धाडगाव, एरंडोल, हातकणंगले, मिरज, रहाता, राहुरी, सिंधखेड, विटा, यावल 1 प्रत्येकी.

मराठवाडा : औरंगाबाद, शिरूर अनंतपाल 3 प्रत्येकी, औसा, भोकरदन, कन्नड, परभणी, सिल्लोड 2 प्रत्येकी, देवणी, जालना, लातूर, लोहा, सोनपेठ, वसमत ? प्रत्येकी.

विदर्भ : संग्रामपूर 7, अमरावती 4, बुलढाणा, रामटेक, तेलहरा 3 प्रत्येकी , आर्वी, बार्शीटाकळी, दर्यापूर, देवळी, धामणगाव, मंगळुरपीर, नांदुरा, पेरसेओनी, वाशिम 2 प्रत्येकी, अकोट, अंजनगाव, आष्टी, बटकुली, चांदूर, चिखलदरा, देऊळगाव राजा, गोंदिया, जळगाव जामोद, कळमेश्वर, कंपटी, कारंजालाड, काटोल, खामगाव, खारंघा, मालेगाव, मौदा, मेहकर, मोर्शी, मूर्तिजापूर, नांदगाव काजी, नरखेडा, नेर, पातूर, साकोली, सेलू, वर्धा 1 प्रत्येकी.

घाटमाथा : इुंगरवाडी 3, कोयना (पोफळी), ताम्हिणी 2 प्रत्येकी.

 पुढील हवामानाचा अंदाज  

27 जून : मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.
28-30 जून : कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.
1 जुलै : कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

 इशारा  

27 जून : मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनजा व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता.
28 जून : कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनजा व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता.
29 जून : कोंकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता.
30 जून : कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता.
1 जुलै : कोंकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.