Central Advisory Committee: केंद्रीय सल्लागार समितीच्या सदस्यपदी पुण्याच्या प्रा. जायभये यांची निवड

एमपीसी न्यूज : भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय संचालित अन्न पुरवठा महामंडळाच्या केंद्रीय सल्लागार समितीच्या सदस्यपदी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य प्रा. सचिन जायभाये यांची निवड झाली आहे.(Central Advisory Committee) राज्यसभा खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी प्रा. जायभाये यांच्या नावाची शिफारस केली होती.

Senior Citizen day: पूर्णविराम माहिती नाही, त्यामुळे आनंदाने जगा – प्रा. गणेश शिंदे

केंद्रीय सचिव मदन मोहन मौर्य यांनी या निवडीचे पत्र दिले असून ही निवड पुढील दोन वर्षांकरिता असणार आहे. डॉ. महात्मे व केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या या संधीतून चांगले काम करण्याचा माझा प्रयत्न असेल.(Central Advisory Committee) ग्राहकांचे अन्न पुरवठ्यासंदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करेल, असा विश्वास प्रा. जायभाये यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.