Pune : ‘शाश्वत जीवनशैली ‘ विषयावरील ‘वनराई’ वार्षिक विशेषांकाचे रविवारी प्रकाशन

एमपीसी न्यूज- नववर्ष सुरु होताना पर्यावरणस्नेही जीवनशैलीचा संकल्प मांडणाऱ्या ‘शाश्वत जीवनशैली ‘ विषयावरील वनराई वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. रविवारी (दि. 30) दुपारी साडेतीन वाजता वनराईच्या ‘इको ‘ सभागृहात होणार आहे. ‘वनराई ‘चे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला महापौर मुक्ता टिळक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

डॉ . एम . एस .स्वामिनाथन, डॉ . माधव गाडगीळ, डॉ . हेमा साने, डॉ. भूषण पटवर्धन, गीता अय्यंगार इत्यादी मान्यवरांचे लेख या वार्षिक विशेषांकात आहेत. ‘वनराई ‘ चे अध्यक्ष रवींद्र धारिया हे वनराई मासिकाचे संपादक असून अमित वाडेकर हे कार्यकारी संपादक आहेत .

यावेळी उपस्थित मान्यवर ‘माझा नववर्षाचा पर्यावरणस्नेही संकल्प’ मांडणार आहेत. तसेच पर्यावरण विषयक लेखन करणाऱ्या ज्येष्ठ मान्यवरांचा सत्कारही श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.