Pune : ग्राहक म्हणून आले आणि दुकानदाराची सोन्याची चैन चोरून गेले

एमपीसी न्यूज : किराणा दुकानातील सामान खऱेदी करण्याच्या बहाण्याने दुकानदाराच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून चोरटे पसार झाल्याची घटना काल शुक्रवारी  (दि.21)  रात्री साडेनऊच्या सुमारास काळेपडळ येथील रतन नेपचुन सोसायटीतील शॅाप मध्ये घडली.

याप्रकरणी राकेश चौधरी (वय 23, रा. काळेपडळ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राकेश यांचे नुकतेच सुरू करण्यात आलेल्या किराणा दुकानात थांबले होते. दरम्यान त्यांच्या दुकानात तीन अनोळखी इसम दूचाकीवर तेथे आले. किराणा दुकानातील सामान खरेदी करण्याच्या बहाण्याने ते राकेश यांच्या जवळ आले आणि अचानक राकेश यांच्या गळ्यातील 40 हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून तोडून चोरून नेली.

याप्रकरणी तीन अज्ञात इसमांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.