Bhosari: मोबाईल दुकानदाराची 9 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – नऊ लाखांचे मोबाईल घेऊन पैसे न देता फसवणूक केल्याप्रकरणी एकावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 17 ऑक्टोबर ते 21 डिसेंबर 2018 या कालावधीत घडला.

संजय लक्ष्मण दास माटावयणी (वय 42, रा. पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दिलीप आबासाहेब पाटील (वय 36, रा. कमलराज हरीद्‌वार, आळंदी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपीचे मोबाईलचे दुकान आहे.  फिर्यादी व मुकेश दयाराम तलरेजा  यांच्याकडून आरोपीने 9 लाख 12 हजार रूपयांचे मोबाईल फोन घेतले होते. त्याचे पैसे न देताच दोघांची फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.