BNR-HDR-TOP-Mobile

Pune : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शनिवारी पुण्यात

एमपीसी न्यूज – राज्यात गेल्या पाच वर्षांत भाजप महायुती सरकारने केलेली विविध विकासकामे आणि लोककल्याणकारी योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रदेश भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेली महाजनादेश यात्रा शनिवारी (14 सप्टेंबर) संध्याकाळी पाच वाजता पुणे शहरात येणार आहे, अशी माहिती अध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.

महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा शुक्रवारपासून (13 सप्टेंबर) सुरू होणार आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजता येथे हडपसर येथे पुणे शहर भाजपच्या वतीने भव्य स्वागत करण्यात येणार आहे.

महाजनादेश यात्रेच्या मार्गावर सुमारे ६० छोट्या मोठ्या चौकात मगरपट्टा, पूलगेट, गोळीबार चौक, सेव्हन लव्हज चौक, स्वारगेट, सारसबाग, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, दत्तवाडी, नळ स्टॉप, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, शेतकी महाविद्यालय चौक, संचेती चौक, आरटीओ, जहांगीर रुग्णालय, तारकेश्‍वर चौक, येरवडा, नगर रस्ता मार्गे चंदननगर असा यात्रेचा मार्ग आहे. दुसर्‍या दिवशी सकाळी दहा वाजता दांडेकर पूल येथून यात्रा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल.

HB_POST_END_FTR-A2

.