Pune : कॅन्टोन्मेंटमधून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रतिनिधी सदानंद शेट्टी यांची बंडखोरी

एमपीसी न्यूज – पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रतिनिधी सदानंद शेट्टी यांनी बंडखोरी केली आहे. आज वाजतगाजत जोरदार शक्तिप्रदर्शन करीत शेट्टी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी सदानंद शेट्टी म्हणाले, माझं नाव काँग्रेसकडून पाठविण्यात आले होते. नवीन चेहरा देणार असल्याचेही सांगितले होते. मात्र, ऐनवेळेस माझा पत्ता कट करण्यात आला. निष्ठेची विष्ठा करायची होती का? असा सवालही शेट्टी यांनी उपस्थित केला.

कॅन्टोन्मेंट भागातील झोपड्यांचे मला पुनर्वसन करायचे आहे. अधिकाधिक झोपडपट्टीमुक्त करायचे आहे. सदानंदनगर त्याचे उदाहरण आहे. काही श्रेष्टींचा माझा उमेदवारीला का विरोध आहे?, मला कळत नाही. हे माझे राजकिय जीवन उद्धवस्त करण्याचा प्रकार आहे. काँगेसचा अंतर्गत गतबाजीचा फटका मला बसला.

शहराध्यक्ष म्हणून रमेश बागवे यांना उमेदवारी दिल्याचे हास्यास्पद उत्तर देण्यात आले. काँगेस उमेदवार पराभूत व्हावा, असे मला वाटत नाही. माझे काय चुकले?, याचे समाधान झाले पाहिजे. अन्यथा, पक्षही सोडू, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.