Pune : ‘कोरोना’मुळे आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर होत असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागासह संबंधित सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या शनिवार व रविवारी असलेल्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. याकरिता प्रशासन कुठेही कमी पडणार नाही. यामुळेच पालिकेच्या आरोग्य विभागासह संबंधित विभाग व ‘कोरोना’ प्रतिबंध कार्यवाहीसाठी निगडीत असलेल्या सर्व महापालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

तर, विधानसभेचे कामकाज शनिवारीही चालू राहणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांनाही उपस्थित राहण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.