Pune Corona Update : 1419 रुग्ण कोरोनामुक्त, 1695 नवे रुग्ण, 28 जणांचा मृत्यू

सध्या शहरात 890 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 529 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट आटोक्यात येत असून, मंगळवारी तब्बल 1419 नागरिक या आजारातून मुक्त झाले. 6 हजार 753 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1695 नवे रुग्ण आढळले. 28 जणांचा मृत्यू झाला.

सध्या शहरात 890 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 529 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाचे पुणे शहरात 74 हजार 98 रुग्ण झाले आहेत. 97 हजार 68 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे.

आतापर्यंत या कोरोनामुळे 2 हजार 332 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 15 हजार 247 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

सिंहगड रोडवरील 75 वर्षीय महिलेचा, धायरीतील 65 वर्षीय महिलेचा पाटील हॉस्पिटलमध्ये, गुरुवार पेठेतील 45 वर्षीय पुरुषाचा, मार्केटयार्डमधील 102 वर्षे महिलेचा, कोंढवा बुद्रुकमधील 77 वर्षीय महिलेचा, कोथरूडमधील 53 वर्षीय पुरुषाचा, महात्मा फुले पेठेतील 52 वर्षीय पुरुषाचा, वानवडीतील 50 वर्षीय महिलेचा, शुक्रवार पेठेतील 64 वर्षीय पुरुषाचा, वडगावशेरीतील 75 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

मुंढव्यातील 67 वर्षीय पुरुषाचा बुधराणी हॉस्पिटलमध्ये, आंबेगाव बुद्रुकमधील 49 वर्षीय पुरुषाचा मोरया हॉस्पिटलमध्ये, सिंहगड रोडवरील 55 वर्षीय पुरुषाचा, कात्रजमधील 48 वर्षीय पुरुषाचा, वडगांव बुद्रुकमधील 73 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, कात्रजमधील 72 वर्षीय पुरुषाचा, पर्वतीमधील 71 वर्षीय पुरुषाचा, वडगावशेरीतील 51 वर्षीय महिलेचा केईएम हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

मुंढव्यातील 72 वर्षीय पुरुषाचा, कात्रजमधील 87 वर्षीय पुरुषाचा नायडु हॉस्पिटलमध्ये, मार्केटयार्डमधील 80 वर्षीय महिलेचा पुणे अडव्हेंटिस्ट हॉस्पिटलमध्ये, पर्वतीमधील 34 वर्षीय महिलेचा, कल्याणीनगरमधील 71 वर्षीय पुरुषाचा, कोंढाव्यातील 38 वर्षीय पुरुषाचा, वडगावमधील 56 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, वानवडीतील 85 आणि 73 वर्षीय पुरुषाचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, वडगांवशेरीतील 61 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.