Pune Corona Update : 903 नवे रुग्ण तर 609 जणांना डिस्चार्ज

903 new patients and 609 discharged आतापर्यंत 16 हजार 188 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

एमपीसी न्यूज – कोरोनाचे शुक्रवारी 903 रुग्ण आढळले. 609 ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. या रोगामुळे 14 जणांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या आज 4 हजार 315 चाचण्या करण्यात आल्या. पुणे शहरात आता 26 हजार 77 रुग्ण झाले आहेत. 443 रुग्ण क्रिटिकल असून, त्यात 74 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

आतापर्यंत 16 हजार 188 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या रोगामुळे आजपर्यंत 800 नागरिकांना आपल्या प्राणास मुकावे लागले. त्यांना कोरोना व्यतिरिक्त इतरही आजार होते. ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 9 हजार 89 आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

हिंगणे खुर्दमधील 64 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, कात्रजमधील 55 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, दत्तवाडीतील 70 वर्षीय महिलेचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, घोरपडी पेठेतील 66 वर्षीय पुरुषाचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये, कोथरूडमधील 55 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, पर्वती दर्शनमधील 43 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, कोंढाव्यातील 42 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, बिबवेवाडीतील 60 वर्षीय पुरुषाचा पुना हॉस्पिटलमध्ये, शिवाजीनगर गावठाणमधील 60 वर्षीय महिलेचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, स्वारगेट परिसरातील 55 वर्षीय पुरुषाचा सिमबायोसिस हॉस्पिटलमध्ये, कोथरूडमधील 29 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, ताडीवला रोड परिसरातील 56 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, कोंढाव्यातील 64 वर्षीय महिलेचा केईएम हॉस्पिटलमध्ये, धनकवडीतील 63 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.