Pune Corona Update : दिवसभरात 193 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ !

एमपीसी न्यूज : पुण्यात आज दिवसभरात 193 नवे रुग्ण सापडले. तर 169 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.आज करोनाबाधीत एका रुग्णाचा मृत्यू झाला.

शहरात एकूण 151 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 252 जण ऑक्सिजन बेडवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 1 लाख 95 हजार 187 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 1683 वर पोहोचली आहे. आजपर्यंत एकूण 4801 रुग्णांचा मृत्यू झाला.

तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारिरीक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.