Today’s Horoscope 16 February 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग – वार – मंगळवार, ​दि​. 16 फेब्रुवारी 2021

  • शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
  • आज विशेष – वसंत पंचमी. श्री पंचमी.
  • राहू काळ – दुपारी 03.00 ते 04.30.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – रेवती 20.56 पर्यंत नंतर  अश्विनी.
  • चंद्र राशी – मीन 20.56 पर्यंत. नंतर मेष.

 

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – राखाडी)
आज  मन चंचल राहील, हातचे सोडून मृगजळामागे धावण्याचा मोह होईल,  इतरांच्या भानगडीत न पडता फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करूनच कार्यक्षेत्रात उद्दिष्टे साध्य करू शकाल.

.

वृषभ – (शुभ रंग – मरुन)
तुमची पतप्रतिष्ठा वाढेल. आप्तस्वकीयात तुमच्या शब्दास मान राहील. पैशाअभावी रखडलेली कामे मार्गी लावल. आज जे काही मनात आणाल ते तडीस न्याल. आज आशादायी व यशदायी दिवस.

मिथुन – (शुभ रंग – सोनेरी)
इतरांवर विसंबून न राहता स्वावलंबनाचे धोरण ठेवा. आज मित्रांच्या फार नादी लागू नका, फक्त स्वतःच्याच भल्याचा विचार करा. कोणत्याही स्पर्धेत आज अंतिम विजय तुमचाच राहील.

कर्क – (शुभ रंग – चंदेरी)
आज अतिआक्रमकतेने घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते. दानधर्म करताना आपली मिळकत ही विचारात घेणे गरजेचे.

सिंह – (शुभ रंग – गुलाबी)
कसलेही नवे उपक्रम सुरु करायचे असतील तर आजचा दिवस योग्य नाही. आज कष्टांचा ही अतिरेक टाळा. हार्डवर्क पेक्षा स्मार्टवर्कची गरज ओळखा. ज्येष्ठांनी उपासनेत खंड पाडू नये.

कन्या – (शुभ रंग – आकाशी)
धंद्यात आवक-जावक सारखीच राहील. नवे परिचय व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील. आज तुम्ही आपल्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल.

तूळ – (शुभ रंग – सोनेरी)
अधिकारी वर्गाला हाताखालच्या माणसांशी जुळवून घ्यावे लागेल. काही जुनी येणी मागितली तर वसूल होण्याची शक्यता आहे. आज खेळाडूंचा स्पर्धेतील विजय नक्की.

वृश्चिक – (शुभ रंग – आकाशी)
मित्रांमध्ये केवळ मोठेपणा घेण्यासाठी काही न परवडणारा खर्च आज आपण कराल. कलेच्या क्षेत्रात नवोदितांना संधी मिळतील. रुग्णांना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळेल.


धनु – 
(शुभ रंग – भगवा)
प्रॉपर्टीविषयी काही कामे रखडलेली असतील तर अशा कामांना चालना मिळेल. नवविवाहितांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल. मतभेद विसरुन आज भावंडे एकत्र येतील

मकर – (शुभ रंग – पिस्ता)
अधिकारी वर्गाने कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करताना सतर्क राहावे. कोर्ट प्रकरणे कोर्टाबाहेर निपटून टाकणे हिताचे राहील. विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून बाकी सर्व काही सुचेल.

कुंभ – (शुभ रंग – मोरपंखी)
आज तुम्हाला विविध मार्गांनी आर्थिक लाभ होतील, एखाद्या सामाजिक कार्यात तुमचं योगदान द्याल. व्यापार्‍यांच्या उत्पन्नात वाढ होईल नवे उपक्रम आज बिनधास्त सुरु करा.

मीन – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आज योग्य माणसे तुमच्या संपर्कात येतील. अथक परिश्रम, चिकाटी यांच्या सहाय्याने यश दृष्टिक्षेपात येईल. प्रामाणिक प्रयत्नांना यश 100% मिळेल. पत्नी म्हणेल त्याला आज हो म्हणून मोकळे व्हा.

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.