Pune : शहरात आज ‘कोरोना’बाधित आणखी एका रुग्णाचा मृत्यू!

एमपीसी न्यूज – पुण्यात ‘कोरोना’ विषाणूने बाधित झालेल्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून मयत व्यक्ती हि 46 वर्षीय महिला होती. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांना निमोनिया झाल्याने त्यांना उपचारासाठी दाखल केले होते. यावेळी या महिलेची ‘करोना’ची तपासणी केली होती. त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

पुणे विभागात २ एप्रिल २०२० सायंकाळपर्यंत ८५ पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात पुणे ४१, पिंपरी चिंचवड १४, सातारा ३, सांगली २५, कोल्हापूर २ अशी आकडेवारी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.