Pune Crime : मुलीला मारहाण करणाऱ्या जावयाला समजावण्यासाठी गेलेल्या सासूबाईला मारहाण

एमपीसी न्यूज : मुलीला त्रास देत असल्याकारणाने (Pune) समजावण्यासाठी गेलेल्या सासूबाईला जावयाने मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. औंधच्या उच्चभ्रू आकाशगंगा सोसायटीत हा प्रकार घडला. याप्रकरणी प्रमोद वसंत वनशीव याच्या विरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 56 वर्षीय सासूने या प्रकरणी तक्रार दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, प्रमोद वनशीव हा आपल्या पत्नीला त्रास देत होता. त्यामुळे त्याची समजूत काढण्यासाठी सासू ही इतर नातेवाईकांसोबत गेली होती. सासू आणि इतर नातेवाईक घरी आल्याचा राग मनात धरून प्रमोद याने मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या सासूला आरोपीने हात पिरगळून जमिनीवर ढकलून दिले. यामुळे खाली पडलेल्या सासूबाईचा उजवा खांदा निखळला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Pune : सिगारेटसाठी पैसे न दिल्याने एकाला मारहाण, सोनसाखळीही हिसकावली

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.