Pune Crime News : कोथरूडमध्ये अल्पवयीन मुलाचा खून करून मृतदेह निर्जन ठिकाणी फेकला

एमपीसी न्यूज – कोथरूड परिसरात एका अकरा वर्षीय मुलाचा खून करून त्याचा मृतदेह निर्जन परिसरात फेकून दिला. पौड रस्त्यावरील केळेवाडी परिसरात हा प्रकार घडला. मृतदेह सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून शवविच्छेदनासाठी हा मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

विश्वजीत वंजारी (वय 14) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. मृतदेह सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर कोथरूड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात हलवला आहे. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत विश्वजीत हा केळेवाडी परिसरात कुटुंबीयांसह राहत होता. मागील दोन दिवसांपासून तो बेपत्ता होता. कुटुंबीयांनी शोध घेऊनही तो न सापडल्यामुळे त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली होती. कोथरुड पोलिसांनी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान पोलीस त्याचा शोध घेत असताना आज दुपारी त्याचा मृतदेह केळेवाडी परिसरातील एका मोकळ्या मैदानावर सापडला. यावेळी त्याच्या डोक्यात मारहाण केली असल्याचे दिसून आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.