Pune Crime News : हनी ट्रॅपद्वारे व्यावसायिकांना लुबाडणाऱ्या ऍड विक्रम भाटे याला अटक

एमपीसी न्यूज -बलात्काराची खोटी केस करण्याची धमकी देऊन(Pune Crime News) व्यावसायिकांना लुबाडणार्‍या वकिलासह दोघांवर बलात्काराचा गुन्हा नोंद झाला आहे. अ‍ॅड. विक्रम भाटे (वय ३4, रा. हडपसर) आणि वैभव शिंदे (वय ३4) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या दोघांनी आधी एका महिलेवर बलात्कार केला आणि त्याचे व्हिडिओ तयार केले.

 

त्यानंतर हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडित महिलेला दुसऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात 32 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.  हा प्रकार वाघोलीत जून 2021  ते 25 जानेवारी 2023 दरम्यान घडला.

 

Pune Crime News : रमजान निमित्त खर्चाकरीता पैसे देण्यास नकार दिल्याने पत्नीने पतीला भोसकले

याप्रकरणी अधिक माहिती अशी की. विक्रम भाटे यांनी बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन एका व्यापाऱ्याला सतरा लाख रुपयांनी लुबाडले होते. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी त्याला अटक केली होती. दरम्यान आरोपी वैभव व अॅड. विक्रम यांनी तक्रारदार महिलेच्या घरी जाऊन त्यांना कोल्ड्रींकमध्ये काही तरी दिले. त्यानंतर त्यांच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. अनैसर्गिक अत्याचारही केला. त्याचे नकळत व्हिडिओ चित्रण केले. ते दाखवून पिडीत महिलेला दुसर्‍यासोबत शारीरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्याचेही चित्रणकरून व्यावसायिकांना लुबाडले जात होते.
हडपसरमधील व्यावसायिकालाही असेच हनी ट्रॅपमध्ये फसविण्यास सांगितले. परंतु, तो व्यावसायिक या पिडीत महिलेच्या ओळखीचा असल्याने नकार दिला. तेव्हा दुसर्‍या तरुणीची भाटे याने मदत घेतली. भाटे व इतर अशा प्रकारे फसवणूक करीत असल्याचे तिने या व्यावसायिकाला सांगितल्यावर त्याने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी भाटे याला अटक केली. त्यानंतर आता या तरुणीनेही आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार दिली आहे. सहायक निरीक्षक गोडसे (Pune Crime News) तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.