Pune Crime News : प्रेम संबंधाच्या रागातून बहिणीच्या प्रियकराच्या भावावर जीवघेणा हल्ला

एमपीसीन्यूज : दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दांडेकर पूल परिसरात एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. सावत्र बहिणीचे प्रेम संबंध मान्य नसल्यामुळे एका तरुणाने वडिलांसह बहिणीच्या प्रियकराच्या भावावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला.

दोन दिवसांपूर्वी दांडेकर पूल परिसरात हा प्रकार घडला. दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी हर्षद गणेश जातेगावकर (वय २३), गणेश जातेगावकर (वय ५५, रा. शुक्रवार पेठ) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर हातागळे असे जखमी झालेल्याचे नाव आहे. आकाश बापू मस्के यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी रात्री अकराच्या सुमारास समीर आणि आकाश राहत्या घरासमोर शेकोटी करून बसले होते. समीरचा भाऊ अमनचे एका मुलीशी प्रेम होते. त्याचा राग मुलीचा सावत्र भाऊ हर्षदला होता.

त्याचा वचपा काढण्यासाठी बाप- लेकांनी समीरवर कोयत्याने हल्ला केला. त्यामुळे समीर गंभीररित्या जखमी झाला आहे.

याप्रकरणी दत्तवाडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.